रविवार, १३ डिसेंबर, २०१५

श्री जोगेश्वरी माता मंदिर पब्लिक ट्रस्ट



नोंदणी क्रमांक ए / २७९ / स्थापना ३जुलै१९५९ 
जोगशेलू तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे

संस्थापक कै. डॉ. बाबुराव नाबाजी देसाई
अध्यक्ष श्री शशिकांत राजधर पाटील   ९४२२७८७०७१
 
श्री हरी उत्तम देसले
संचालक
श्री नाथ भिवसन सोनवणे
संचालक
श्री निक्कंठ मोतीराम पाटील
संचालक
सौ शुभांगी शशिकांत पाटील
संचालक
श्री सुरेश बळीराम पाटील
संचालक
श्री सदाशिव नथु देसले
संचालक
कु  सौरभ  शशिकांत पाटील
संचालक
श्री संतोष  दौलत देसले
सचिव

श्री जोगेश्वरी मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धारास सहकार्य करा

श्री जोगेश्वरी माता जीर्णोद्धार व महिमा


प्रिय श्री भाविक व समाज बांधाव,

आमच्या विश्वस्थ मंडळाने मातेच्या  भाविकांचे स्वप्न जीर्णोद्धार व मंदिर हे मोठे  देवस्थान म्हणून प्रसिद्ध  प्राप्त होण्यासाठी प्रयत्न सुरु  केला असून, चेन्नई येथील मंदिराचे शिल्पकार श्री रविशिल्पी यांनी रु ७४ लाखाचा आराखडा तयार केला असून, त्यांनी आजपर्यंत जवळपास २५० मंदिरांना  सुंदर रूप दिलेले आहेत, शिरपूर तालुक्यातील बिजासनी मंदिर व बालाजी मंदिर हे त्यांचे सुंदर व ज्वलंत उदाहरण आहे. श्री जोगेश्वरी मातेच्या मंदिराला सुंदर रूप देण्याचा मानस व्यक्त केला आहे. यासाठी मोठी देणगी / मदत प्राप्त करणेसाठी मंडळाने मंदिराच्या नोंदवही मध्ये भाविकांच्या पत्त्यावर माहिती असलेली जीर्णोद्धार विनंती पत्रे जवळपास ३००० भाविकांना पोस्टाद्वारे व २००० भाविकांना नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने प्रत्यक्ष विनंती पत्र दिलेले आहेत. परंतु त्याला अल्प प्रतिसाद लाभला असून व त्यातील नाशिक जिल्ह्यातील कुलदैवत असलेल्या निफाड , दिंडोरी , चांदवड , लासलगाव  तालुक्यातील द्राक्ष , डाळिंब , कांदा उत्पादक भाविकांनी बरेच प्रमाणात मंदिराचे काम पूर्ण होईल एवढी संपूर्ण मदत देण्याचे ठरविले होते व त्याप्रमाणे विश्वस्थ मंडळास आमंत्रित केले होते,    त्याप्रमाणे विश्वस्थ मंडळाच्या सदस्यांनी प्रत्यक्ष भेटून मंदिरासाठी विनंती केली असता प्रचंड गारपीठ व अवकाळी पावसाने आमचे नुकसान झाले असून मातेच्या मंदिर जीर्णोद्धारास आर्थिक मदत देण्यास असमर्थ आहोत , आसे दु:खी   मनाने आम्हाला सुचित केले विश्वस्थ मंडळाने सुद्धा प्रत्यक्ष सर्व परिस्थिती पाहिली असून त्यामुळे विश्वस्थ मंडळाने चैत्र यात्रोत्सावानंतर ज्या गावात गारपीठ किंवा नुकसान न झालेल्या भाविक असलेल्या गावांना संपर्क केला जाणार असून जे भाविक एकत्र येवून आम्हास  निमंत्रित करतील , त्यांच्याकडे देणगी व मदत प्राप्त करणेस समक्ष भेट देण्यात येईल .

     श्री जोगेश्वरी मातेच्या महिमाबद्दल नाशिक येथील श्री जाधव  नामक  व्यावसायिकांनी मला राजस्थान मधील इतिहासाचा अभ्यास असलेल्या  भटांनी व्यवसायाची भरभराट होण्यासाठी व कौटुंबिक स्थेर्यासाठी तुम्ही श्री जोगेश्वरी मातेच्या हेमाड पंथी तुमचे कुलदैवताचे मूळ देवस्थान असलेल्या श्री जोगेश्वरी मातेच्या मंदिरात आशीर्वाद प्राप्त  करण्यासाठी जावे व त्या सूचनेप्रमाणे मी व माझे कुटुंब गेली पाच वर्षापासून मूळ देवस्थान असलेल्या मंदिरात येत असून  त्यामुळे माझ्या जीवनात खूप  बदल झाला. माझे तिन्ही मुलांचे कारखाने , बंगले झाले आहेत व सर्व कुटुंबाला सुख व स्थेर्य प्राप्त झाले आहे

     तसेच निमगुळ , ता. शिंदखेडा तेथील दोन भगिनी, त्यांचे भावाचा भीषण अपघात होऊन डोक्याची कवटी  फुटल्यामुळे आता उपचार शक्य नाही असे  धुळे येथील सुप्रसिद्ध आस्था हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मुंबई , पुणे येथे तुमच्या जवाबदारीने  न्या. परंतु त्याचा काही उपयोग होणार नाही  असे सांगितले. परंतु आम्ही दोन्ही भगिनींनी विश्रांती न घेत श्री जोगेश्वरी मातेचा जप आळीपाळीने केला . त्यामुळे आमच्या भावाच्या प्रकृतीत शंभर टक्के  सुधारणा होवून तो आज चांगला होऊन त्याचे काम प्रभावीपणे  स्वत: करीत आहे . हे सर्व मातेच्या महिम्यामुळे शक्य झाले आहे . त्यामुळे आम्ही दोघी भगिनी मातेच्या चरणी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी न चुकता येत आसतो , आसे विश्वस्थ मंडळाजवळ व्यक्त केले  व लवकरच मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार होईल , असे सर्व भाविक आनंदाने आम्हाला सांगतात . देवीच्या महिमेवर विश्वास ठेऊन श्रीमंत, गरीब समाज बांधव यांनी मुक्त हाताने मदत करतील व देवस्थानाला   मोठे देवस्थान म्हणून प्रसिद्ध पारपत होऊन सर्वांचे कुलदेवत असणारे , नसणारे समाज बांधव आशीर्वाद प्राप्त करणेसाठी भेट देतील , अशी अपेक्षा  विश्वस्थ मंडळाचे सदस्य व जोगशेलू ग्राम पंचायत पदाधिकारी , ग्रामस्थ यांनी  आशा व्यक्त केली आहे .     

संपर्क


श्री शशिकांत राजधर पाटील,
अध्यक्ष  

९४२२७८७०७१


श्री संतोष  दौलत देसले   

सचिव

९४०४५७५३४७